उपस्थित भाविकांकडून गोपगोपिकांचे कौतुक !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या ” लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल” च्या चिमुकल्यांनी फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरात चालू असलेल्या, “अखंड हरिनाम सप्ताह” च्या सहाव्या दिवशी, आपल्या कलागुणांना वाट करून देताना, ह्या वयात सुद्धा आपल्या हिंदू संस्कारांचा साक्षात्कार घडविला. त्यांचे बाजारपेठेतील भाविकांनी ग्रामस्थांनी आणि मंदिर व्यवस्थापकांनी कौतुक केले… प्रारंभी या चिमुरड्या गोपगोपिकांनी आपल्या सुरातून हे कृष्ण s गोविंदss हरेs मुरारीss | हेs नाथss नारायण वासुदेवsss भगवान श्रीकृष्णाची आळवणी, यशने केली.आणि मंदिर भारावले. त्या मागून भक्ती पदे आणि राधाकृष्णाच्या नाम- गजराने मंदिर दुमदुमले. मध्येच मुलांनी गायलेली भक्तीगीत- गायनाने पालक आणि भाविक सुखावले. त्यानंतर झिम्मा- फुगड्यांनी “खेळीया” श्रीकृष्णाच्या प्रांगणात, बालगोप-गोपीकांचा खेळ रंगला. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्कूलच्या प्राचार्या विनया लिंग्रस, सहाय्यक शिक्षिका करुणा चींदरकर, रिया भिसे, गौरी गावकर, मीनाक्षी चव्हाण, श्वेता शिंदे, प्राजक्ता लाड, सहाय्यक उर्मिला कुशे यांनी, मुलांकडून आपल्या संस्कार कार्यक्रमाचे संयोजन उत्स्फूर्तपणे सादर केले. या संपूर्ण उपक्रमाचे पालक ग्रामस्थ भाविकांकडून कौतुक करण्यात आले.