गुन्हे तपाससकामात माहीर आणि खाकी वर्दीतील दर्दी गायक म्हणून सुपरिचित
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजेंद्र उर्फ राजू जामसंडेकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलात राजू जामसांडेकर हे एक सर्व परिचित नाव असून पोलीस म्हणून रुजू झाल्यानंतर मालवण पोलीस स्टेशन, कणकवली पोलीस स्टेशन, त्यानंतर जिल्हा विशेष शाखा, वैभववाडी पोलीस स्टेशन, हायवे टॅब त्यानंतर आता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामध्ये ते कार्यरत आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये तपास कामात त्यांचा विशेष हातखंडा राहिला आहे. गुन्ह्याची गोपनीय माहिती काढण्यात राजू जामसांडेकर हे पोलीस दलात विशेष अग्रक्रमाने नाव घेतले जाते. त्यांना मिळालेल्या या बढती बद्दल त्यांचे सर्वच सरातून कौतुक केले जात आहे.