कणकवली (प्रतिनिधी) : ज्यांनी वडिलोपार्जित ठेकेदारी काका विजय नाईक, मुरलीधर नाईक ,भाऊ वैभव नाईक, सतीश नाईक, अनिल नाईक आणि स्वतः छोटा नाईक ठेकेदार असे असताना आणि ज्यांची हयात ठेकेदारी मिळवण्यात आणि भ्रष्टाचारात घर भरण्यात गेली त्या नाईक कुटुंबांनी ठेकेदारी या विषयावर आ. नितेश राणे, निलेश राणेंवर आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. कुडाळ मतदारसंघातील सर्व कामे कोल्हापूरच्या डी आर कन्स्ट्रक्शन डाके ठेकेदाराला देऊन त्याच्यात भागीदारी कोणाची हे छोटू नाईक यांनी माहिती करून घ्यावे. कुडाळ मालवण मतदारसंघातील यांच्या ठेकेदाराने केलेलं रस्ते २ पावसाळे तरी टिकले का याचा जाब छोटू नाईक यांनी आपल्या भावाला विचारावा. फक्त प्रसिद्धी साठी आमच्या आमदार नितेश राणेंवर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची हे धंदे आता नाईकांनी बंद करावेत. ज्यांचे दुकानंच ठेकेदारांवर चालत त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करणे चुकीचे. आ. नितेश राणेंवर फक्त टीका आणि आरोप करून तुम्ही अजून ३० वर्षे आमदार होणार नाहीत हे लक्षात असूद्या. नितेश राणे हे आता कणकवली मतदारसंघातील जनतेचे कुटुंबातील सदस्य झालेले आहेत. त्यांच्यासारखे काम करा आणि आमदारकीची स्वप्ने बघा. डी आर कन्स्ट्रक्शन आणि नाईक कुटुंब यांचे संबंध काय हे देखील छोटा नाईकने जनते समोर बोलावे. सुशांत नाईक यांची काही ठिकाणी अनधिकृत फ्लॅट आहेत ते जर आव्हान स्वीकारत असतील तर मी त्यांना दाखवू शकतो. त्यामुळे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ही नाईक कुटुंबीयांची सवय आता बदला असा सल्ला यावेळी संतोष पुजारे यांनी दिला आहे.