भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव यांची सडकून टीका
कणकवली (प्रतिनिधी) : सेनेचे उबाठा गटाचे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची कणकवली शहरातील राजकीय अवस्था “काका मला वाचवा ” अशीच झाल्याने ते कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्यावर बालिश आरोप करीत आहेत.त्यांच्या बाललीला त्यांनी घरापुरत्याच मर्यादित ठेवाव्यात,त्यांची दखल कणकवली शहरवासीय ही घेत नाहीत.असे सडेतोड उत्तर माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी दिले आहे.
सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली होती.त्याला आज माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा प्रवक्ते जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून जोरदार सडेतोड उत्तर सुशांत नाईक यांना दिले. जाधव म्हणाले की,कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी सत्तेत नसताना आणि आता सत्तेत असताना विकासाची अनेक कामे केली आहेत. शिवाय त्यांचा सतत जनसपंर्क असतो. लहानपासून थोरा पर्यंत सर्वांशिश ते सतत आपल्या मतदार संघात संपर्क ठेवतात. रोजगार,आरोग्य अशा बाबीत त्यांनी वैयक्तिक अनेक गरजूना स्वतःच्या खिशातून मदत केली.त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहेत. या त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे विरोधक राजकीय दृष्ट्या” कोमात “गेले आहेत त्यामुळेच सुशांत नाईक, सतीश सावंत, अतुल रावाराणे, संदेश पारकर ही आमदारकीसाठी” हावरट “झालेली उबाठा सेनेची राजकीय मंडळी बेताल वक्तव्य करीत आहेत. जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटे नाटे आरोप करत आहेत. खरे तर ही सेनेची मंडळी आमदार राणे यांच्या समोर निवडणुकीत टिकाव धरू शकत नाही त्यामुळे ते नैराश्यग्रस्त झाले आहेत. नाईक यांच्या बालिशपणाच कहर म्हणजे आमदार राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्यावर टीका केली. स्वीय सहाय्यक कसा प्रामाणिक असावा याचं उत्तम उदाहरणं म्हणजे परब यांची ओळख आहे. त्यांना उगाचच अशा रजकारणात ओढू नका.
ठेकेदारी कशी करावी, मॅनेज कशी करावी, हे बालिश नाईक यांनी त्यांचे काका आमदार वैभव नाईक यांच्या ठेकेदारीच्या विद्यापीठात शिकावी किंवा ते शिकले ही असतील. ठेकेदारी विदयापीठचे कुलगुरू आमदार नाईक आहेत. हे त्यांच्या पुतण्या नाईक यांनी अवगत करून घ्यावे. समाज कल्याण विभाग (राज्य सरकार ) बेंच प्रकारणात सेनेचे च्या नेत्यांचं प्रेम खूप उतू जातं आहे हे ही आम्ही समजू शकतो. ही योजना जिल्ह्यात सुरु व्हावी म्हणून जिल्हा नियोजन समिती सभागृहात खूप संघर्ष केला. त्यानंतर अनेकांनी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजना आपल्या मतदार संघात राबविली. त्यांच अनुषंगाने आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदार सदर योजना मार्फत विकास कामे व्हावीत म्हणून शिफारस केली. या कामावर नियंत्रण हे समाजकल्याण (राज्य सरकार )याचं आहे. त्यात काही त्रुटी आढळ्यास किंवा गैरव्यवहार त्याला संबंधीत विभाग जबाबदार राहणार आहे. यात आमदार राणे यांना जबादार धरणे म्हणजे “येडा होऊन पेढा “खाण्याचा प्रयत्न सुशांत नाईक करीत आहेत. त्यांनी मर्यादा ओलांडू नये. जे बोलायचे असेल ते पुरवा देऊन बोलावे. बेच चुकीच्या जागी बसविले असेल तर याचा जाब संबंधीत अधिकारी यांना विचारून कारवाईची मागणी आम्हीही करू.मात्र ज्यात आमदार राणे यांचा संबंध नाही त्यात त्यांच्या बाबत नाहक गैरसमज पसरवू नका. यात तुम्ही यशस्वी होणार नाही करणार मतदार, जनता आणि दलित समाज यांचा आमदार राणे यांच्यावर खूप विश्वास आहे. ते पुन्हा प्रचंड मताधिक्याने कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातून जनतेच्या आशिर्वादामुळे निवडून येणार आहेत. त्यामुळे नाईक यांनी अशी बालिश वक्तव्य करू नये असे सडेतोड उत्तर माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा प्रवक्ते जाधव यांनी दिले आहे