नातेवाईकांनी घातपात असल्याचा व्यक्त केला संशय ; एकजण ताब्यात
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कसाल बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती व्यवसाय असलेल्या सचिन श्रीकांत भोसले (वय 41) यांचा मृतदेह आज कसाल बालमवाडी येथे तो राहत असलेल्या घरामध्ये आढळून आला. कान व नाकातून रक्तस्त्राव होऊन मृत झालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत नेमके स्पष्ट झाले नसले तरी नागरिकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी सचिन यांच्या नातेवाईकाला ताब्यात घेतल्याचे समजते.
ही घटना रविवार 12 मार्च रोजी रात्री घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस यामागे नेमकं कारण काय ? याचा तपास करत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे शवविच्छेदना नंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकणार आहे. दरम्यान पोलिसांनी मात्र आपल्या तपासाचा वेग वाढविला आहे