ग्रामपंचायत अधिकारी, वेतनश्रेणी,जुनी पेन्शन मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचयात अधिकारी संघटना शाखा सिंधुदुर्गकडून राज्याध्यक्ष संजीव निकम, राज्य सरचिटणीस सचिन घरत यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी DNE 136 जिल्हा सिंधुदुर्ग मार्फत ग्रामपंचायत अधिकारी नामाभिधान, वेतन श्रेणी सुधारणा,2005 मधील ग्रामसेवकांना जुनी पेन्शन या सर्व उल्लेखनीय कामगिरीसाठी संघटनेचे राज्याध्यक्ष संजीवजी निकम आणि राज्य सरचिटणीस सचिन घरत यांचा रविवार 20 ऑक्टोबर रोजी ग्रामसेवक भवन सिंधुदुर्ग या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्याध्यक्ष संजीव निकम आणि राज्य सरचिटणीस सचिन घरत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना राज्य संघटनेने केलेल्या कार्याची माहिती दिली, तसेच संघटना विषयक इतर सर्व बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष प्रेम असल्याचे राज्य अध्यक्ष महोदय यांनी सांगितले. ग्रामपंचायत अधिकारी पदाच्या फाईल चा प्रवास, त्यासाठी घेतलेली मेहनत याबाबत मार्गदर्शन केले. राज्य सरचिटणीस सूचित घरत यांनी 2005 मध्ये नियुक्ती झालेल्या ग्रामसेवकाना जुनी पेंशन लागू करण्यासाठी संघटनेने केलेल्या प्रयत्नांना कसे यश आले याबद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळा कार्यक्रमाला मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष सखाराम काशीद, कोकण विभागीय उपाध्यक्ष हुमणे, जिल्हाध्यक्ष जळगाव नंदकुमार गोराडे, जिल्हा अध्यक्ष बीड मधुकर शेळके, रत्नागिरी सरचिटणीस संजय दळवी, जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष के. डी. पाटील, विजय चोथे, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष, विलास पाटील, मा. पतसंस्था चेअरमन जळगाव, प्रवीण तेलप संचालक बीड पतसंस्था, ओम चोपणे तालुका अध्यक्ष केज, प्रकाश सूर्यवंशी ग्रामपंचाय अधिकारी बीड, माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग संतोष गावडे, सूर्यकांत वारंग आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राज्य अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस यांच्या वर सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.तसेच महिला भगिनींकडून पंचारती ओवळण्यात आली. तसेच त्यांचा शाल, श्रीफळ, श्री गणेश मूर्ती आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वर्दम जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग यांनी केले. तसेच आभा संतोष पालव सरचिटणीस सिंधुदुर्ग यांनी मानले. या सर्व कार्यक्रमा मध्ये जिल्हा पदाधिकारी पतसंस्था चेअरमन अमित दळवी, उपाध्यक्ष संदीप गवस, कार्याध्यक्ष प्रसाद ठाकूर, सहसचिव प्रवीण नेमण, संघटक उज्वल झरकर, महिला उपाध्यक्ष रेश्मा गोवळकर, प्रसिद्धी प्रमुख अनिल चव्हाण, संघटक सुजाता जगताप, कोषाध्यक्ष सुनील प्रभूदेसाई, कायदे सल्लागार शशिकांत गुरव, कणकवली तालुका अध्यक्ष वैभव धुमाळे, सचिव वैभव ठाकूर, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य, पतसंस्था सदस्य, मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू आणि भगिनीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!