उबाठा या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी नाव ठेवावे

भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांची घणाघाती टीका

दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करुन सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही

१०० जागांवर सुद्धा उबाठाचे उमेदवार नाहीत

राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा फोनही घेत नाही


कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी नाव ठेवावं, कारण त्यांचा काँग्रेसने जागा वाटपात सातत्याने कचरा केला आहे. त्यामुळे उबाठा नावही आता त्यांना शोभत नाहीय, अशी घणाघाती टीका भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी केली. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाचा कचरा केला. नंतर दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करुन सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित नाही केला. संजय राऊत बेडकासारखा फुगून आम्ही सेंचुरी मारणार असे सांगत आहेत. मात्र सेंच्युरीची गोष्ट बोलणाऱ्या बालबुद्धी संजय राऊतला सेंचुरी मारण्यासाठी शंभर जागा लढवाव्या लागतात, तेव्हाच स्ट्राईक रेट शंभर टक्केच्या आसपास होतो. शंभर सोडा हे आता ८८ जागांवर उबाठा आहे आणि काही दिवसात हे ८८ च्या खाली जातील. आणि स्वतःच्या पक्षाला गुंडाळावे लागेल, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी, संजय राऊत यांनी जेव्हा युतीत होते तेव्हाचे दिवस आठवावे. भाजप सोबतचा इतिहास तपासावा, तेव्हा कसे होता ? तेव्हा काय मान सन्मान कसा होता, आता असा कचरा केला आहे की, ८८ जागा घ्यायच्या तर घ्या नाहीतर बाजूला व्हा. राहुल गांधीच दर्शन उद्धव ठाकरेंना दूरच झालेलं आहे. कारण राहुल गांधीच्या डाव्या उजव्यासोबत उद्धव ठाकरेला भागवावं लागत आहे. राहुल गांधी याच्या जवळपास पण नाही. नियतीचा खेळ असा आहे की राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा आता फोनही घेत नाही आहेत. २०१९ ला सत्ता स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा फोन घेतला नाही. आज राहुल गांधी याचे फोन घेत नाही, याला नियतीचा फेरा म्हणतात. उगाच छाती ताणून दाखवू नका तुमची लायकी काँग्रेसने उद्धव महाराष्ट्रातील जनतेला योग्य पद्धतीने दखवलेली आहे.
एअर बस प्रकल्प जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाच गुजरातला गेलेला आहे. आताचा तो विषय नाहीय. संजय राऊतला पत्रकार परिषदेत चपलांनी मारलं पाहिजे होते. कारण संजय राऊत सकाळी एक बोलतो संध्याकाळी बोललेलं विसरतो हा त्याचा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. सुपारीबाज हे वक्तव्य संजय राऊत उद्धव ठाकरेंबाबत बोलले असतील. कारण उद्धव ठाकरेंच्या घरात येणाऱ्या सगळ्या वस्तू वसुलीच्या पैशातून येतात, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!