6 लाखाची विनपरवाना सिगारेट जप्त

फोंडाघाट चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकाचा कारवाई

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आचारसंहिता काळात अशोका ट्रॅव्हल्स च्या खाजगी लक्झरीमधून होत असलेली विनापरवाना सिगरेट वाहतूक फोंडाघाट चेक पोस्टवरील स्थिर सर्वेक्षण पथकाकडून आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर फोंडाघाट चेकपोस्टवरील ही सलग दुसरी कारवाई आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाकडून ह्या लक्झरीची तपासणी करण्यात आली असता गोल्ड फ्लेक कंपनीच्या सिगरेट असल्याचे आढळून आले. तब्बल 6 लाख रुपये किमतीच्या या सिगरेट असल्याचे समजते. दरम्यान अशा प्रकारे तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक करताना त्याला परवान्याची गरज असते. मात्र परवाना नसल्याने स्थिर सर्वेक्षण पथकातील पोलिसांनी तपासणी केली असता ही अवैध सिगरेट वाहतुक उघडकीस आली. फोंडाघाट चेक पोस्टवर कार्यरत असणारे पोलीस अंमलदार उद्देश कदम, प्रशांत पाटील, नितीन बनसोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!