वेदिका मॅथ्स परीक्षेमध्ये सेंट उर्सूल स्कूल चा अनय सावंत प्रथम
कणकवली च्या एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स क्लासला बेस्ट अबॅकस सेंटर पुरस्काराने सन्मानित
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात पार पडलेल्या वेदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटीशन आणि प्रोऍक्टिव्ह अबॅकस परीक्षेमध्ये मध्ये कणकवलीच्या एन्टिटी प्रोएक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स सेंटरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून वेदिका मॅथ्स परीक्षेमध्ये सेंट उर्सूला स्कूल चा सहावीतील अनय संजय सावंत प्रथम आला असून त्याचबरोबर नंदिनी राणे (८वी ),कृतिका सावंत (९वी ) यांचा प्रथम क्रमांक तर श्लोक मांगे, अभा हजारे, प्रवीण खानविलकर, खुशी तावडे, रिद्धी रजपूत, दुर्वा तावडे यांचा द्वितीय क्रमांक व इशा चिंदरकर, गार्गी तांबे, नारायण रणशूर, स्विझल डिसोझा, भूमी कांबळी यांचा तृतीय क्रमांक मिळाला आहे.तर अबॅकस या स्पर्धेत शाश्वत तांबे (तिसरा), तनया पवार (चौथा), रूचा सावंत (पाचवा) क्रमांक पटकावून ट्राॅफीचे मानकरी ठरले तसेच तस्मय दळवी, भाग्यश्री पवार, ध्रुव कुवळेकर, अंश राठोड, जय खरात, श्रीनित राजूरकर, जय कोकरे, जागृती खरात, भागयेश सावंत, विवान पाटील, सांची जाधव, अनुश्री पुजारी, नारायण रणशूर, रिद्धी रजपूत, गौरांग राऊत, दुर्वांक राणे, आयुषी पुजारी, निमिष पवार, खुशी तावडे, यश गोसावी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर शहरात ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या या परीक्षा स्पर्धेमध्ये कोल्हापूर,सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वेदिका मॅथ्स आणि अबॅकस सेंटर च्या विध्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.६ मिनिटात १०० गणिते सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेच्या युगात कमीतकमी वेळेत गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडत असते.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्राॅफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच कणकवली येथील एन्टिटी प्रोएक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स क्लासला बेस्ट अबॅकस सेंटर हा विशेष पुरस्कार मिळाला. विद्यार्थ्यांना एन्टिटी प्रोएक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स सेंटरच्या संस्थापिका सौ.पूजा राणे मॅडम तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सर्व मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.