शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे टीकास्त्र
कणकवली ( प्रतिनिधी ) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कणकवली मधील सोनगेवाडी वार्ड क्रमांक 11 मध्ये बारा वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या गार्डनचे पुन्हा उद्घाटन करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे, अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केली. मुळात सदर गार्डन हे पूर्णतः मृत अवस्थेत जाण्यास स्थानिक नगरसेवक जबाबदार आहे व त्याला साथ देणारी त्यांची सत्ताधारी टोळी ही तितकीच जबाबदार आहे कारण एक फूट जागा जात असताना जनतेचे पैशातून तयार केलेल्या गार्डनचे पंधरा ते वीस लाख रुपये नुकसान करून गार्डन तोडण्यात आले मुळात गार्डन चुकीचे बांधण्यात आले असेल तर त्यापासून झालेले नुकसान भरपाई करण्यास कोण जबाबदार हे मागील दोन वर्षे आवाज उठवू नाही सत्ताधारी त्याचे उत्तर देत नाही आहेत .
आज सोनगेवाडी मधील गार्डन पूर्णतः सुकलेल्या व मृत अवस्थेत आहे त्याला कारणीभूत कोण याचाही जनतेने विचार करणे गरजेचे आहे. सोनगेवाडी मधील गार्डनचे रान व इतर गवत गवताच्या फांद्या पाच पाच पट उंच वाढल्या स्थितीत होत्या तरीसुद्धा ठेकेदाराला त्याचे पैसे सात ते आठ महिने दिले जात होते स्थानिक लोकांनी आवाज उठवल्यानंतर नगरसेवक सुशांत नाईक व कन्हया पारकर यांनी गार्डनला भेट देऊन मुख्याधिकारी यांच्या ही गोष्ट निदर्शना आणून दिली व ठेकेदारी ला मिळणार पैसे बंद करण्यात आले .
माननीय माननीय पालकमंत्री साहेब यांना एक विनंती आहे गार्डनचे उद्घाटन करण्यापूर्वी त्या गार्डनची आताची असलेल्या अवस्था आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून पाहणी करावी आणि नंतरच उद्घाटनास जावे . सत्ताधाऱ्यांनी सोनगेवाडी चा विकास मागील दहा वर्षात काय केला तो स्थानिक जनता पूर्णता जाणून आहे त्यामुळे असे दिखाऊपणाचे उद्घाटनाचे कार्यक्रम करून जनतेची फसवणूक करणे सत्ताधरी नेत्यांनी थांबवावी.पालकमंत्र्यांची दिशाभूल करून त्यांना झालेल्या उद्घाटनाचे पुन्हा उद्घाटन करण्यास लावून त्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी करू नये आणि सोनगेवाडी चा विकास दहा वर्षे तुम्ही करू शकला नाही ते मान्य करावे.