कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वागदे गावात सरपंच संदीप सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त शिवार फेरी काढून प्रसिद्धि करण्यात आली. यावेळी उपसरपंच शामल गावडे, कृषी सहाय्यक म्रुदुला प्रभु , ग्रा पं सदस्य निलम पालवी, सुप्रिया काणेकर, संजना गावडे आदी उपस्थित होते.












