कणकवली उड्डाण पुलाखाली लावलेल्या वाहनांवर होणार कारवाई

डंपर चोरीला गेल्याने कणकवली पोलिसांचे कारवाईचे संकेत

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील हायवे उड्डाणपुलाखाली गेले काही महिन्यांपासून विविध वाहने अनधिकृतरित्या पार्किंग करण्यात आली आहेत. त्यातील ओव्हरब्रिजखाली पार्किंग केलेला एक डंपर शुक्रवारी रात्री ११ वाजता चोरीला गेला. त्यामुळे कणकवली पोलीस सतर्क झाले असून अशा अनधिकृत पार्किंग केलेल्या अवजड वाहनांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून कारवाईचे संकेत कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिले आहेत.

ओव्हरब्रिजखालील डंपर चोरीच्या घटनेनंतर बेकायदेशीर वाहने लावलेल्या संबंधित मालकांनी आपली वाहने काढून वैयक्तिक पार्किंगच्या जागेमध्ये लावावीत, असे आवाहन देखील तूर्तास करण्यात आले आहे.

मात्र मागील काही दिवस हायवे प्राधिकरण आणि त्यांचे संबंधित अधिकारी ओव्हरब्रिजखालील दुकाने असतील किंवा पार्किंग केलेली वाहने असतील यावर कारवाई केली होती. मात्र मध्ये मध्ये हुल देण्याचं काम प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांचं सुरू आल्याचं दिसून येतंय. मात्र हे प्रकार आता थांबविण्यास पोलीस तरी यशस्वी ठरतील का ? अशा चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत.

error: Content is protected !!