राऊत यांच्या विजयाची हॅट्ट्रिक निश्चित – अरुण दुधवडकर
कणकवली (प्रतिनिधी) : वर्षातील 365 पैकी 200 हून अधिक दिवस खासदार विनायक राऊत मतदारसंघात जनतेसोबत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सावलीप्रमाणे राऊत असतात. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी चा ससेमिरा मोदी सरकार ने लावला आहे.
राज्यात महाविकास आघाडी काळातील सरकार आणि महायुती चे सरकार मधील जुलूमशाही चा लेखाजोखा जनतेसमोर मांडा असे आवाहन शिवसेना उपनेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले. विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्ट्रिक होणारच आल्याचेही दुधवडकर म्हणाले.इंडिया आघाडीच्या पदाधिकारी बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या कार्याचा लेखाजोका पुस्तिका प्रकाशन प्रसंगी दुधवडकर बोलत होते.
हॅट्ट्रिक होणारच











