भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा पलटवार
कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून अकलेचे तारे संजय राजाराम राऊत याने तोडले आहेत. लोकसभा आचारसंहितेच्या काळात पंतप्रधान मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान असल्याचा जावई शोध राऊत यांनी लावला आहे. ईशान्य मुंबई ची जागा स्वतःच्या ढुंगणात ताकद नसल्याने संजय पाटील यांना देणारा आणि साधी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता असलेल्या राऊत याने आपली अक्कल दाखवली आहे अशी टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. जोवर नवीन लोकसभा अस्तित्वात येत नाही तोवर 4 जून पर्यंत मोदीच पंतप्रधान असणार आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही.मुंबईत केजरीवाल समर्थनार्थ केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे ची लायकीच राहुल गांधींनी दाखवली आहे. इलेक्टरोल बॉण्ड चे पैसे ठाकरे गटाला कोणी दिले याची चर्चा व्हायला हवी. मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताकाळात आणि कोव्हीड काळात ज्यांना ठेकेदारी मिळाली त्या ठेकेदारांनी दिलेल्या फंडिंग चा हिशोब द्यावा. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत बसून मोठा जोक केला आहे की मणिपूर लडाख ला फडणवीस यांना जाण्यासाठी स्वतः प्रवास खर्च करतो. ज्या उद्धव ने आजवर स्वतःचे अंतर्वस्त्र स्वतःच्या पैशाने विकत घेतले नाही, देवाकडे फुलेही स्वतःच्या पैशाने नेले नाहीत ते फडणवीस यांना प्रवासाला पैसे देण्याची गोष्ट करतायत हा जोक आहे. मणिपूर फाईल्स काढण्याऐवजी दिशा सालियान फाईल्स वर पिक्चर काढा. त्या पिक्चरमध्ये आदित्य ठाकरे ला मेन रोल द्या असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.