आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे ,आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोनाळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले.
यावेळी माजी पं स सभापती अरविंद रावराणे, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश शेलार, बूथ प्रमुख समाधान जाधव, आदि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते..