खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत जागतिक योग दिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत शाळेचे उच्च श्रेणी मुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली.व योगासने आपल्या सर्वासाठी आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहेत याविषयी शिक्षकांनी माहिती दिली. तर शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे व शिक्षिका रुपाली पारकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. शालेय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आजच्या योग दिन कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला.

यावेळी शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी, अलका मोरे, आरती जेजोण, शीतल राठोड अबिदा नाईक यांनी उपक्रम यशस्वी वितेसाठी प्रयत्न केले.

error: Content is protected !!