विद्यार्थ्यांना केले मोफत वह्यावाटप
देवगड (प्रतिनिधी) : कुवळे रेंबवली गावचे सरपंच सुभाष कदम यांनी सरस्वती विद्या मंदिर कुवळे नं 1 या प्राथमिक शाळेच्या पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मोफत वह्या वाटप केल्या. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल परब मुख्याध्यापक शिरगावकर सर उपसरपंच प्रदोष प्रभुदेसाई शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.या उपक्रमा बद्दल सरपंच सुभाष कदम यांचे विशेष कौतुक शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक आणि पालक वर्ग यांनी केले.












