अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण जयंती साजरी

अनेकांनी मनोगतातून शाहू महाराजांच्या कार्याचा केला गौरव

वैभववाडी (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे प्राचार्य बी.एस.नादकर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला. प्रशालेचे पर्यवेक्षक शिंदे एस.बी यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्य यांचा थोडक्यात परिचय आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना करून दिला. कु.परी इंदूलकर या विद्यार्थीनीने शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे मनोगत आपल्या भाषणातून व्यक्त केले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक एस.बी. शिंदे. , पी.एम.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख पी.बी.पवार, व्ही.एस.मरळकर, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत, एन.सी.सी.ऑफीसर एस.टी.तुळसणकर, कलाशिक्षक आर.एस.पी.अधिकारी एम.एस.चोरगे., वाय.जी.चव्हाण,एन,व्ही.प्रभु. तसेच आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!