कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव मध्ये शेतीकामाना वेग आला असून भातलावणी लगबग शेतकरी करत आहेत. यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांचे कुटुंब प्राधान्याने शेतीची कामे उरकण्याकडे लक्ष देत आहेत. ओसरगाव गावठाणवाडी तील शेतकरी कुटुंब सध्या आपल्या शेतीत राबताना दिसत आहेत. भात लावणी करताना पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून महिला भगिनी शेतात पारंपरिक इरली डोक्यावर घेऊनभात लावणी करताना दिसत आहेत. तर लावणी साठी आवश्यक चिखल करताना आधुनिक यंत्रसामुग्री चा वापर शेतकऱ्यांकडून केला जात असंल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील बच्चे कंपनीही शेतात जाऊन भातलावणी साठी चिखल करण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. एकंदरीत पावसाने साथ दिल्यामुळे शेतकरी भात लावणीच्या कामात व्यस्त आहेत.


















