वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात बुधवार १७ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपुर येथील विठ्ठला च्या दर्शनासाठी जाता येत येत नाही अश्या वयोवृद्ध आणि गरीब वारकऱ्यांसाठी नाधवडे गावरहाटीतील गावकऱ्यांच्या सहकार्याने हा भव्यउत्सव साजरा करण्यात येत असून आपण सर्व भाविकांनी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीला सकाळी ६ ते ७ वा. श्री विठ्ठल रखुमाई दुग्ध स्नान, वस्त्र घालणे, मंत्र, अभिषेक, सकाळी ७ ते ९ वा. पूजा अर्चा, सकाळी ९.०० वा. नैवेद्य व आरती, सकाळी ९.३० वा. सर्व मान्य प्रथेनुसार नाधवडे गावातील विठ्ठल भक्त स्व. कृष्णाजी (बाबली) नारकर आणि स्व. तुकाराम पावसकर या दोघांच्या कुटुंबातील व्यक्तींनी श्री विठ्ठल रखुमाईस तुळसीहार अर्पण केल्यानंतर सर्व भक्तभाविकांसाठी देवदर्शनास प्रारंभ होईल, सकाळी १०.३० वा. गावातील व गावाबाहेरील सर्व दिंड्या चवाटी मातेच्या मंदिरात जमतील. तिथे मंदिरात अभंग- गजर करून पुढे दिंडीला मार्गस्थ, होईल दुपारी २.०० वा. सर्व दिंड्यांचे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आगमन, दुपारी २ ते ३ वा. दिंडीतील भाविकांना दर्शन / उपवास फराळ वाटप, दुपारी ३ ते ६ वा. बाहेरील नामांकित वारकरी भजनाचा कार्यक्रम, सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ – ह.भ.प. राजन महाराज साळुंखे (खांबाळे) सायं. ७ ते८.३० वा. ह.भ.प. संजय महाराज साळवी यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम, रात्रौ ८.३० ते १० वा. गावातील स्थानिक भजने, रात्री १०.१५ वा. शेजआरती.