शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते येण्यात गौरविण्यात
कणकवली (प्रतिनिधी) : विमान प्रवासासह ईस्रो सहल आणि लाखो रुपयाची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS-2024 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक १०:३० वा भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी STS- 2024 मधील जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
STS-2024 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना १८ जून ते २१ जून या कालावधीत विमानाने त्रिवेंद्रम (केरळ) येथे ईस्त्रो सहलीला नेण्यात आले होते तसेच २ री व ३ री मधील १० गुणवंत विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटर ची भेट घडविण्यात येणार आहे.
इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील २५० विद्यार्थ्यांना रोख अडीज लाखाची रोख बक्षिसे, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत, यांनी केले आहे.