चेक अनादर प्रकरणी जयंत राणेस १ वर्ष कारावाससह रोख दंडा ची शिक्षा

ऍड. विलास परब, तुषार परब यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोनटक्के यानी चेक अनादर प्रकरणी आरोपी जयंत दिगंबर राणे रा. लोरे नं. १ यास चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील कलम १३८ नुसार गुन्हा शाबीत झाल्याने एक वर्षे तुरुंगवास व रु ८९०००० इतकी नुकसान भरपाई दोन महीन्याच्या आत द्यावी व नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली आहे.

यातील फिर्यादी अनिल ज्ञानदेव वाळवे रा,तिवरे यानी जयंत राणे यास त्याच्या मागणीनुसार मैत्रीच्या संबधातून सन २०१९ मध्ये रु. ८९००००/ इतकी रक्कम परतफेडीच्या अटीवर उसनवार दिली होती. आरोपी जयंत व फिर्यादी अनिल वाळवे यांच्यात त्याबाबत नोटरी यांच्यासमोर करारपत्र होऊन आरोपीने देय रकमेचा धनादेश वाळवे याना दिला. वाळवे यानी सदर धनादेश बॕंकेत वटविण्यासाठी जमा केला असता आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे न वटता परत आला. म्हणून वाळवे यानी आपल्या वकीलांमार्फत अनादरीत धनादेशातील रक्कम मिळण्यासाठी नोटीस पाठविली. परंतु नोटीस पोहोच होऊनही आरोपीने रक्कम न दिल्याने फिर्यादी अनिल वाळवे यानी आपल्या वकीलांमार्फत आरोपी विरूद्ध कणकवली न्यायालयात सन २०२० साली खटला दाखल केला. खटला चालून आरोपीविरुध्द चेक अनादराचा सबळ पुरावा निष्पन्न झाल्याने न्यायालयाने दिनांक १४ आॕगस्ट रोजी आरोपी जयंत राणे यास वरीलप्रमाणे तुरूंगवासाची व दंडाची शिक्षा सुनावली. फिर्यादी अनिल वाळवे यांच्या वतीने ॲड. विलास परब व ॲड. तुषार परब यानी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!