प्रकल्प संघटनेचे अध्यक्ष रवींद्र नवाळे आणि कार्याध्यक्ष हरेश पाटील यांची माहिती
फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली गावच्या प्रलंबित मागण्या न्याय मार्गाने शासन दरबारी मांडून त्यावर ठोस निर्णय मिळविण्याकरिता नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने व नवीन कुर्ली गावातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्याने आज गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 या स्वातंत्र दिनादिवशी रोजी सकाळी मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, ओरोस यांच्या कार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषण चालू करण्यात आले होते. उपोषण स्थळी मा. पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर तसेच मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग ओरोस यांनी भेट देत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य करीत उपोषण मागे घेण्यास सांगितले परंतु प्रकल्पग्रस्त उपोषण कर्त्यानी लेखी स्वरूपात सर्व मागण्या मान्य झाल्याचे पत्र द्या नंतर उपोषण सोडतो असे सांगितले आहे.