कणकवली (प्रतिनिधी) : एकीकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले आजही ऊन्ह वारा वादळ झेलत आज ही दिमाखदार पने उभे आहेत. तर महाराजाचा ८ महिन्या आधी अनावरण केलेला पुतळा आज कोसळला. ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेला नैसर्गिक आपत्ती कारणीभूत आहे की कामाचा दर्जा हे आता चौकशी अंती स्पष्ट झाले पाहिजे.
परंतु खरच सदर दृश्य पाहून वाईट वाटले. या या सदर कामाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतच जर असे निकृष्ट दर्जाचे काम ही एक मनाला वेदना देणारी गंभीर बाब आहे तरी संबंधित ठेकेदारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे जेणेकरून यापुढे अशा स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे बीज निर्माण होणार नाही तरी या घटनेचे सखोल चौकशी व्हावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वा खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल











