खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावच्या म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी या गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते किशोर शंकर कांबळे यांची नुकतीच गावच्या ग्रामसभेत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पोंभुर्ले गावच्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच दी.३० ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गावच्या सरपंच श्रीम.प्रियंका धावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत पोंभुर्ले गावच्या म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री किशोर कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सादीक डोंगरकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अशोक पाडावे, पोलीस पाटील राखी मोंडे, ग्रा.पं.सदस्य मयुरी कांबळे, राजेश्री धुमाळे, सपना फाळके, पूजा समजिस्कर, मैमुना शिरगावकर, नितीन तेरवणकर, उदय बावकर, ग्रामस्थ संजय धावडे, छोटू कांबळे, गुनिदास कांबळे आदी उपस्थित होते.
किशोर कांबळे हे पोंभूर्ले बौद्धजन उन्नती मंडळाचे माजी चिटणीस तसेच देवगड तालुका बौध्दजन सेवा संघ विजयदुर्ग विभाग या संघटनेचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले असून संघटनेचे बौद्धचार्य म्हणून सद्या ते या विभागात कार्यरत आहेत.
“पोंभुर्ले गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली. माझ्यावर जो विश्वास दाखवला. याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो व सर्वांना विश्वासात घेऊन गावातील प्रश्न संमजसपणे मिटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित तंटामुक्ती समिती अध्यक्ष किशोर कांबळे यांनी यावेळी सांगितले.”