रोटरी क्लब वैभववाडी चे अध्यक्ष प्रशांत गुळेकर व शिक्षक गोपाळ ठाकूर यांजकडून

खारेपाटण हायस्कूल च्या एन एम एम एस परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके संच वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील एन एम एम एस स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष प्रशांत गुळेकर व खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक गोपाळ ठाकूर यांनी संयुक्तरित्या प्रत्येकी १० पुस्तकांचा संच नुकताच भेट स्वरूपात विद्यार्थ्यांना दिला. प्रशांत गुळेकर व शाळेचे शिक्षक गोपाळ ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहशालेय शैशणीक उपक्रमाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सर्व संचालक मंडळ सदस्य यांनी आभार मानले असून शाळेचे मुख्याद्यापक संजय सानप संतोष राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत एन एम एम एस परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तके वितरीत करण्यात आली.

error: Content is protected !!