सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवलीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजारा

कणकवली (प्रतिनिधी) : वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे 2 सप्टेंबर रोजी ग्रामसंसद हरकुळ बुद्रुक येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामसंसद हरकुळ बुद्रुकचे सरपंच बंडू ठाकूर व राष्ट्रीय सेवा योजना संयोजक प्रा. अरविंद कुडतरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आले. सरपंच ठाकूर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाना आजच्या युगात वृक्ष लागवड करणेची नितांत गरज असल्याचे सांगून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे योग्यप्रकारे संगोपन करण्याचे सूतोवाच केले.

आजचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरविंद कुडतरकर आणि डॉ. शुभांगी माने, वैभव यादव, विद्यार्थी प्रतिनिधी विकी राठोड, ललित कासवकर, वैभवी गिरकर, समृध्दी सावंत भोसले, सुयश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!