फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज महाराष्ट्र राज्य शासनाने गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप फोंडाघाट विकास सेवा सोसायटीच्या शासनाच्या रेशन धान्य दुकान मध्ये वाटप केला. यावेळी संजना संजय आग्रे, सरपंच ग्रामपंचायत फोंडाघाट, श्रध्दा दिलिप सावंत उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग, राजन नानचे चेअरमन फोंडाघाट विकास सेवा सोसायटी, धृवबाळ गोसावी सोसायटी संचालक, विठ्ठल लाड ग्रा.पंचायत सदस्य, एस. बी. सावंत तलाठी फोंडाघाट, प्रसाद देसाई सचिव फोंडाघाट सोसायटी लेखनिक गणेश सावंत, दुकान नंबर 1,2,3, चे सेल्समन सरीता पाटकर नाईक, अशोक तावडे, आर्या नानचे आणि रेशन धान्य दुकान फोंडाघाटचे ग्राहक या वेळी उपस्थित होते. या निमित्ताने बोलताना सरपंच आग्रे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाने गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप केले बद्दल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करून फोंडाघाट मधील जनतेला गणेश चतुर्थी सण उत्साहात साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या…