तीन हजाराची स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी फक्त बाराशे रुपयात…!

माधवबागची विशेष ऑफर; १४ ते २१ मार्च पर्यंत मिळणार हृदयरोग रुग्णांना फायदा

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी खास स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबिराचे दि. १४ ते २१ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते ११.३० या वेळेत हे शिबीर संपन्न होईल. विशेष म्हणजे ३ हजार रुपये किमतीचे हे तपासणी शिबीर केवळ १२०० रुपयांत उपलब्ध होणार आहे.

स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टँडर्ड इन्वेस्टिगेशन आहे. आणि अँजिओग्राफी व बायपास नंतर मांसपेशींना रक्त पोचविण्यातील अडथळा दूर झालेला आहे की नाही हे यामार्फत शोधले जाते. या आधारे हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते. हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे लक्षात येते. रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये कळते. या तपासणीत Hb (हिमोग्लोबिन) १ चाचणी- १००₹, Lipid Profile (कोलेस्ट्रॉल) ७ चाचण्या- ४५०₹, Bilirubin (यकृत) १ चाचणी- १००₹, Sr Creatinine (किडनी) १ चाचणी- १००₹, HbA1c (डायबेटीस) २ चाचणी- ५००₹ या रक्त तपासण्या करण्यात येतील. यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून १० ते ११ तास उपाशी राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी कणकवली 9373183888, कुडाळ 901132 8581 आणि सावंतवाडी 7774028185 या नंबरवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!