वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे गावचे सुपुत्र प्रगतशिल शेतकरी मंगेश परशुराम कदम यांना राज्यपालांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतिनिष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कदम यांच्या कार्याचा गौरव झाल्याने त्यांचे सर्वच कौतुक होत आहे. मंगेश कदम हे गेली २० ते २५ वर्ष खांबाळे येथे शेती मध्ये विविध प्रयोग राबवित आहेत. आतापर्यं त्यानी फुलशेती जरबेरा, कलिंगड, भुईमुग, आधुनिक भातशेती, विविध भाजीपाला लागवड, हळद लागवड अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती मध्ये विविध प्रयोग करून शेतकऱ्यासमोर दिशादर्शक ठरले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट शासनाने घेतली असुन मुंबई वरळी मुंबई तारांगण येथे २९ सप्टेंबर रोजी झालेया कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृनन यांनी कदम दांपत्यांना पुरस्काराचे प्रदान केला. यावेळी उप मुख्यमंती अजित पवार कृषिमंत्री धनंजय मुंडे कृषि विभागाचे वरिष् अधिकारी उपस्थीत होते. त्यांच्या या सन्मानाबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.