नगरपंचायत वाभवे -वैभववाडी यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे -वैभववाडी नगरपंचायत आयोजित स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान अंतर्गत नगरपंचायत वाभवे -वैभववाडी यांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने गणेश घाट येथे वृक्षारोपण करण्यात आले शिवाय नगरपंचायत कार्यालय ते संभाजी चौक परिसरात वैभववाडी शहराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी नागराध्यक्षा नेहा माईणकर उप संजय सावंत मुख्याधिकारी प्रतीक थोरात प्रशासन व करनिर्धारक उमेश स्वामी, स्वच्छता निरीक्षक सतिश सांगेलकर , लिपिक सचिन माईणकर तसेच सर्व नगरसेवक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.