कणकवली विधानसभा मनसे आढावा बैठक ; गावागावांत शाखा निर्माण कराव्यात , पदाधिका-यांच्या सुचना
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वतंत्र उमेदवार असणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदार संघातून मनसेचा उमेदवार जाहीर होईल. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. गावागावांत मनसेची शाखा निर्माण करण्यासाठी सर्वांनी काम करावे. असे आवाहन मनसे उपजिल्हाअध्यक्ष गणेश वाईरकर , कणकवली संपर्क अध्यक्ष विश्राम लोके यांनी केले.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाअध्यक्ष गणेश वाईरकर, कणकवली संपर्क अध्यक्ष विश्राम लोके,विधानसभा संपर्क सह सचिव अनंत आचरेकर, कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये,कणकवली शहर अध्यक्ष योगेश कदम,कणकवली उपतालुकाध्यक्ष अतुल दळवी,कणकवली उपशहर अध्यक्ष शरद सावंत, रोहिदास लोंढे , प्रतीक भाट, सूरज पुजारे व इतर मन सैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप सीताराम दळवी यांचे वडील माजी आमदार कै. सीताराम भिकाजी दळवी (आबा) यांचे निधन झाले. तसेच मनसैनिक सुनील प्रभाकर सोनार यांच्या मातोश्री यांचे गेल्या महिन्यात निधन झाले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कणकवली तालुका च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. गाव तिथे शाखा या उपक्रमांतर्गत शाखा चालू करण्याच्या सुचना पदाधिका-यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कणकवली तालुका अध्यक्ष समीर तेली यांचे उपजिल्हाअध्यक्ष गणेश वाईरकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.