कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली मध्ये शारदोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या भजन व फुगडी स्पर्धांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेमध्ये गुरुवार दि. १० ऑक्टोबर, २०२४ रोजी शारदोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे इ. ५ वी ते इ. १२ वीच्या गटवार विद्यार्थ्यांच्या भजनस्पर्धा व मुलींच्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकांत दळवी (कार्याध्यक्ष- कळसुली शिक्षण संघ, मुंबई), के. आर. दळवी (स्कूल कमिटी- चेअरमन), नामदेव घाडीगावकर (स्कूल कमिटी – व्हाईस चेअरमन ), रजनीकांत सावंत (स्कूल कमिटी – सदस्य), शुभदा देसाई (स्कूल कमिटी – सदस्य), मुख्याध्यापक – वगरे व्ही.व्ही, शिवाजी गुरव (अध्यक्ष – शाळाव्यवस्थापन समिती), नीलकंठ माधव मुंडले (शाळा व्यवस्थापन समिती – शिक्षणतज्ञ), चंद्रसेन गोसावी (माजी वरिष्ठ लिपिक), मंगेश घाडीगावकर (शाळा व्यवस्थापन समिती – सदस्य), राजाराम चव्हाण, भाई गावकर (पोलीस पाटील), श्वेता दळवी, प्रभाकर दळवी, शिक्षक पालक संघ पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन संघ पदाधिकारी त्याचप्रमाणे पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन स्पर्धेचे उदघाटन बाबाजी मूरकर (शिक्षक पालक संघ- उपाध्यक्ष) यांच्या हस्ते तर फुगडी स्पर्धेचे उदघाटन कोमल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेमध्ये प्रतिवर्षी प्रशाला व शालेय स्वराज्य सभेच्या वतीने सरस्वती पूजन व त्यानिमित्त इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून सत्यनारायण महापुजेचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते.

यावेळी श्री सत्यनारायण महापूजेसाठी विद्यार्थ्यांनी केलेला शिवपिंडीतला मखर व सरस्वतीसाठी केलेली सजावट सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरली. विद्यार्थ्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जोपासावा व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रशालेमध्ये या शारदोत्सवानिमित्त प्रशालेचे माजी कलाशिक्षक कै. जे.जे. दळवी पुरस्कृत भजन स्पर्धा आणि फुगडी स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते. यात गायक व वादक हेसुद्धा विद्यार्थीच असतात. यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीचा प्राथमिक गट तर नववी ते बारावी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट अशा दोन गटांमध्ये या स्पर्धा घेतल्या गेल्या. भजन स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक – इयत्ता पाचवी-सहावी, द्वितीय क्रमांक – इयत्ता सातवी, तृतीय क्रमांक – इयत्ता आठवी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक – इयत्ता दहावी, द्वितीय क्रमांक – इयत्ता नववी व इयत्ता बारावी (विभागून) आणि तृतीय क्रमांक – इयत्ता अकरावी यांना मिळाला. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रशालेचे माजी विद्यार्थी राकेश मिरजुले व अभिषेक सुतार यांनी केले. तर फुगडी स्पर्धांमध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक – इयत्ता आठवी, द्वितीय क्रमांक इयत्ता – सातवी, तृतीय क्रमांक – इयत्ता पाचवी – सहावी तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातून मुलींमध्ये फुगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक – इयत्ता दहावी, द्वितीय क्रमांक – इयत्ता बारावी ,तृतीय क्रमांक – इयत्ता नववी या वर्गांनी पारितोषिके पटकावली. फुगडी स्पर्धांचे परीक्षण कोमल राऊत आणि कु.सानिका राणे (माजी विद्यार्थीनी ) यांनी केले.

या कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेत आयोजित मूर्तिकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला. आपल्या मूर्तीकला परंपरेचा वारसा पुढील पिढीत रुजावा या उद्देशाने कै. महादेव सिताराम सावंत (आप्पा डोंगरे) यांच्या स्मरणार्थ सावंत फाउंडेशन, कळसुली यांच्यावतीने प्रशालेत शनिवार दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी मूर्तिकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धा या इ. ५ वी ते इ. ७ वी (लहान गट ) व इ. ८वी, ९ वी, ११ वी ( मोठा गट ) अश्या दोन गटांत घेण्यात आल्या. प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे ₹१००१,₹७५१/- व ₹५०१/- व उत्तेजनार्थ तिघांना प्रत्येकी ₹१०१/- अशी पारितोषिके देण्यात आली.

या स्पर्धेमध्ये लहान गटातून कु. सिद्धेश नंदन गावकर (इयत्ता ५वी) – प्रथम, कु. सौम्या सतिश सावंत (इयत्ता ५वी) – द्वितीय, कु. सोमिल पंढरी देसाई (इयत्ता ६वी) – तृतीयतर उत्तेजनार्थ ध्रुवी विष्णू देसाई,सर्वेश शिवराम गावकर, धीरज शंकर गावकर मोठ्या गटातून कु. करण संतोष तेली (इ. ८वी )- प्रथम ,कु. गिरीश मंगेश परब (इ.९ वी)- द्वितीय तर दत्तराज महादेव राऊत (इ.११वी) -तृतीय आला तसेच उत्तेजनार्थ प्रथम तीन क्रमांकामध्ये मयुरेश मोती वरक,ऋतुराज शिवराम गावकर,मनाली अरुण घाडीगांवकर सदर मूर्तीकला स्पर्धेचे परीक्षण प्रशालेचे शिक्षक अमर पवार व सचिन आर्लेकर यांनी केले. या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत सांस्कृतिक विभाग प्रमुख अमर पवार व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहकारी त्याचप्रमाणे इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांनी घेतली. संस्था, पालक ग्रामस्थ, माजी विद्यार्थी तसेच रसिक प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!