कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जेष्ठ विधिज्ञ राजेंद्र रावराणे यांचे चिरंजीव ऍड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांना लंडन येथील विद्यापिठाकडून एलएल एम ही पदवी प्राप्त केली आहे. अँड पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी एलएल.बीची पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथील वेस्ट मिनस्टर विद्यापिठात कायद्याच्या उच्च पदवी (एलएल.एम) साठी प्रवेश मिळविला होता. त्यांनी लंडन येथे जाऊन सदर विद्यापीठामध्ये सदरचा अभ्यासक्रम इंटरनँशनल अँण्ड कमर्शियल आर्बीट्रेशन लॉ हा विषय घेऊन यशस्वीरीत्या उच्च प्रथम श्रेणी मिळवून (डिस्टींग्शन) पूर्ण केला. अँड. पृथ्वीराज रावराणे यांनी प्रथम आँटोमोबाईल विषयात अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी वकीलीची एलएल.बी ही पदवी प्राप्त केली असून तद्नंतर कायद्याची उच्च पदवी (एलएल.एम) ही लंडन येथे जाऊन प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आपले वडील अँड. राजेंद्र रावराणे यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबई उच्च न्यायालयात आपला व्यवसाय सुरू करणे पसंत केले असून त्या आधारे जिल्ह्यातील लोकांची सेवा करणे हा त्यांचा मानस आहे.