कासार्डे विद्यालयातील १७ खेळाडूंचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश
तळेरे (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या १८ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यापैकी १४ खेळाडूंची सावर्डे रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडू व मैदानी प्रकारपुढीलप्रमाणे –
१४ वर्षाखालील मुले वयोगटात- ध्रुव शेटये ८० मी हर्डल्स क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक तर प्रथमेश तेली याने तृतीय क्रमांक पटकावला आहे तर १७ वर्षाखालील मुलींच्या गटात- बांबू उडी क्रीडा प्रकारात प्रगती निकम हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. १९ वर्षांखालील मुले व मुली गटात गोळा फेक व थाळी फेक मध्ये आर्यन तारी याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. क्रॉसकंट्री क्रीडा प्रकारात स्वरा पाटील प्रथम तर दिव्या म्हस्के व सुरज तांबे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. नेहा कदम हिने तिहेरी उडी व लांब उडी मध्ये प्रथम तर १०० मी धावणे मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तन्वी साईम हिने ८०० मी धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तर सानिया पाळेकर हिने १०० मी हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पूनम राठोड हिने ३००० मी चालणे मध्ये तृतीय तर विश्वास चव्हाण याने ३००० मी धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पूर्वा गुरव उंच उडी मध्ये प्रथम तर संजीवनी सावंत हिने बांबू उडी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ४०० मी हर्डल्स क्रीडा प्रकारात अथर्व गुरव द्वितीय तर रिले १००×४ क्रीडा प्रकारात नेहा कदम, पूर्वा गुरव, प्राजक्ता मेस्त्री, सानिया पाळेकर यांनी प्रथम पटकवला आहे. बांबू उडी क्रीडा प्रकारात सुशांत नलावडे द्वितीय तर हातोडा फेक क्रीडा प्रकारात क्षितिजा काळे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे सदर विद्यार्थ्यांची दि. १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर रोजी सावर्डे (रत्नागिरी) येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या गुणवंत खेळाडूंचा स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, मुख्याध्यापिका बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही. राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक प्रा.दिवाकर पवार, प्रा.अनिल जमदाडे, देवेंद्र देवरुखकर, यशवंत परब, विनायक पाताडे, नवनाथ कानकेकर, ऋचा सरवणकर, वैष्णवी डंबे यांच्यासह विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर व संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही राणे आदीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.