भाजप युवामोर्चा कणकवली तालुका उपाध्यक्षपदी चिन्मय अशोक तळेकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली प्रहार भवन येथे कणकवली तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कणकवली तालुका उपाध्यक्षपदी चिन्मय अशोक तळेकर यांची निवड करण्यात आली. ही निवड युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, कणकवली तालुकाध्यक्ष अण्णा खाडये, सर्वेश दळवी, सागर राणे आदी उपस्थित होते. तसेच या बैठकीस भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. या नियुक्तीसाठी चिन्मय तळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!