तळेरे (प्रतिनिधी) : कोकणातील देवगड तालुक्यातील वेळगीवे वाघिवरे गावातील परतीच्या पावसामुळे भात शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत, तीन महिने मेहनत करून हातातोंडाशी आलेली शेतीचे होणारे नुकसान बघून वेळगिवे परिसरातील शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. कृषी विभागाने त्वरित लक्ष देने गरजेचे आहे
कोकणातील भातशेती हीच मुख्य शेती आहे, त्यामुळे आता भात कापणीला सुरुवात झाली आहे. दिवसभर भात कापून संध्याकाळी ते पावसाच्या भीतीने घरी आणावे लागते त्यात संध्याकाळी पाऊस पडला की शेती सर्व भिजून जाते
प्रचंड पावसामुळे कापलेल्या आणि आडवे पडलेलं भात पिकांना कोंब येऊ लागल्याने शेतीकरीवर्ग हताश झाला आहे.
महसूल विभागाने पंचनामे करून शेतकरी वर्गांना दिला द्यावा. असे मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.