येणाऱ्या अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त सर्व बुद्ध विहारांसाठी भारतीय संविधानाची प्रत भेट

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटना स्वीकृत करून त्याला या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. येणाऱ्या अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त, 68 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे उपाध्यक्ष संतोष कदम व त्यांच्या पत्नी सुमन कदम यांच्यावतीने तालुक्यातील सर्व बुद्ध विहारांसाठी भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात प्राथीनिधिक स्वरूपात या संविधान प्रतीचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळाचे अध्यक्ष शारदा कांबळे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव रविंद्र, पवार शरद कांबळे यांच्यासह वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेले हक्क आणि कर्तव्य  याची जाणीव व्हावी.  यासाठी भारतीय संविधान वाचून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठीच आपण ही प्रत्येक विहारात उपलब्ध करून देत असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या उपक्रमाबद्दल वैभववाडी तालुका पोलीस सेवा संघाच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!