देवगड (प्रतिनिधी) : जमीन जागेच्या वादावरुन टेंबवली येथे दोन गटात शिवीगाळ व मारहाण करुन परस्पर विरोधी तक्रारीवरून अकरा जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना २८ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ४.३० वा.सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, टेंबवली वेशवीवाडी येथे जमीन जागेच्या वादातून दोन गटात मारहाण झाली.यामधील किरण प्रकाश राणे यांचे सासरे राजाराम संभाजी राणे हे दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वा.सुमारास टेंबवली करेल येथील आंबा काजू बागेमध्ये राखण करीत असताना सुजल मेस्त्री, संतोष हरीश्चंद्र कर्ले, मनिषा दिनेश सावंत, संदेश संतोष राणे, मनिषा दिनेश सावंत यांची मुलगी व दिनेश चंद्रकांत सावंत यांनी त्या ठिकाणी जमाव करून राजाराम राणे यांच्या चेह-यावर उजव्या बाजूस तसेच उजव्या हातावर, पाठीवर व कमरेखाली काठीने व हाताच्या मुठीने मारहाण केली यावेळी त्यांची मुले सोडविण्यास गेली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच किरण प्रकाश राणे यांच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार किरण प्रकाश राणे यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली या तक्रारीवरून पोलिसांनी सहाजणांविरूध्द भादवि १४७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस हेड कॉस्टेबल उदय शिरगावकर करीत आहेत.
याचदिवशी जमीनजागेच्या वादातून सायंकाळी ४ ते ४.३० वा.सुमारास टेंबवली वेशवीवाडी येथील सुमेधा मेस्त्री, दिपाली दिनेश सावंत व त्यांचे पती दिनेश सावंत, संतोष हरीश्चंद्र कर्ले, संदेश संतोष राणे, मनाली दिपक परब हे त्यांची सासू तारामती कर्ले यांच्या टेंबवली करेल येथील आंबा बागेत काम करीत असताना प्रकाश राजाराम राणे, राजाराम संभाजी राणे, किरण प्रकाश राणे, रेणूका प्रकाश राणे, तेजस प्रकाश राणे यांनी एकमेकांच्या संगनमताने सुजय दिनकर मेस्त्री यांच्यावर हल्ल करीत असताना त्यांना वाचविण्यास गेलेल्या दिपाली दिनेश सावंत, संतोष हरीश्चंद्र कर्र्ले, संदेश संतोष राणे यांनी बांबूने डोक्यावर, हातावर, पाठीवर मारहाण केली या मारहाणीमध्ये संतोष कर्ले यांना दुखापत झाली असून त्यांना ओरोस येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.मारहाणीनंतर शिवीगाळ करून परत बागेत पाय ठेवल्यास मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिल्याची तक्रार सुजय दिनकर मेस्त्री यांनी दिली असून पोलिसांनी याप्रकरणी पाचजणांविरूध्द भादवि १४३, १४८, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र कांबळे करीत आहेत.










