दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ने केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता दहावीमध्ये चांगल्या गुणांनी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांतिक सदस्य नीलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपये जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे, कलमठ माजी तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश राणे, प्रवीण कुलकर्णी, सतीश जाधव, निलेश जाधव, संतोष पाटील व कार्यकर्ते व पालक उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.

error: Content is protected !!