सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन 2023-24 शाळा सुरु होत असून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरु होत आहे. विद्यार्थ्यांसाठी शासनाने 57 हजार 468 पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 25 हजार 270 विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 75 लाख 81 हजार इतका निधी दिला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष सन 2023-24 दिनांक 15 जून 2023 पासून सुरु होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा दिनांक 15 जून 2023 पासून सुरु होणार आहेत. यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकती सर्व पूर्व तयारी करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, समग्र शिक्षाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची दि. 13 जून रोजी आढावा सभा घेवून शाळांच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून सखोल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निकषानुसार पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एकुण 57 हजार 468 पाठयपुस्तके प्राप्त झाली असून ती शाळास्तरापर्यंत पोहोच करण्यात आलेली आहेत. तालुकानिहाय पाठ्यपुस्तके पुढीलप्रमाणे- तालुकानिहाय वितरीत करण्यात आलेली मोफत पाठ्यपुस्तके तालुका देवगड पाठ्यपुस्तके संख्या – 8 हजार 460, दोडामार्ग -2 हजार 739, कणकवली- 9 हजार 414, कुडाळ- 11 हजार 972, मालवण-6 हजार 256, सावंतवाडी- 10 हजार 422, वैभववाडी- 3 हजार 134 व वेंगुर्ला- 5 हजार 71 असे एकूण 57 हजार 468 पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली आहेत.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव शाळा शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. दाखल होणान्या मुलांचे स्वागत उत्साहपूर्व व आनंददायी वातावरणात होणार आहे.
शाळा प्रवेशोत्सवाबरोबरच शाळापूर्व तयारी पहिले पाऊल मेळावा क्र. 2 चे आयोजन सुध्दा करण्यात आलेले आहे. तसेच शाळांशाळांमध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरणासाठी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना एक गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तालुकानिहाय वितरीत करण्यात आलेली गणवेश लाभार्थी व त्यासाठी देण्यात आलेली रक्कम पुढीलप्रमाणे – तालुका देवगड गणवेश लाभार्थी- 3 हजार 533, रक्कम रु. 10 लाख 59 हजार 900, दोडामार्ग गणवेश लाभार्थी- 1 हजार 320, रक्कम रु. 3 लाख 96 हजार, कणकवली गणवेश लाभार्थी- 4 हजार 227, रक्कम रु. 12 लाख 68 हजार 100, कुडाळ गणवेश लाभार्थी- 5 हजार 531, रक्कम रु. 16 लाख 59 हजार 300, मालवण गणवेश लाभार्थी- 2 हजार 203, रक्कम रु. 6 लाख 60 हजार 900, सावंतवाडी गणवेश लाभार्थी- 4 हजार 241, रक्कम रु. 12 लाख 72 हजार 300, वैभववाडी गणवेश लाभार्थी- 1 हजार 651, रक्कम रु. 4 लाख 95 हजार 300, वेंगुर्ला गणवेश लाभार्थी- 2 हजार 564, रक्कम रु. 7 लाख 69 हजार 200, एकूण जिल्ह्यातील गणवेश लाभार्थी 25 हजार 270 तर रक्कम रुपये 75 लाख 81 हजार इतकी आहे.
पुणे येथे होणाऱ्या G20Summit च्या पार्श्वभूमीवर लोकसहभाग मिळावा म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ओरोस येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये डायट, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
निपुण भारत कार्यक्रमाची नियोजनपूर्वक अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निपुण भारत अंतर्गत पायाभूत संख्याज्ञान व साक्षरतेसाठी आवश्यकते मार्गदर्शन करण्यात आलेले असून प्रत्येक विद्यार्थी निपुण करण्यासाठी, प्रगत करण्यासाठी शाळा सज्ज आहेत.
यावर्षीसुध्दा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा, बाल कला क्रीडा महोत्सव. इसरो शैक्षणिक सहल इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हयामध्ये 128 शाळा शून्य शिक्षकी झाल्या असल्यातरी उपलब्ध शिक्षकांमधून या सर्व शाळांवर शैक्षणिक कामकाजासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिक्षकाविना कोणतीही शाळा बंद राहणार नाही. याचीही दक्षता घेण्यात आलेली आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेशीत करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी केले आहे.











