वैभववाडी तालुका सहकारी खरेदी- विक्री संघ व सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचा पुढाकार
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात उद्या आठवडा बाजार निमित्ताने बुधवार दि.६ मार्च रोजी सकाळी १० वाजले पासुन , वैभववाडी तालुका सहकारी खरेदी- विक्री संघ व , सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या तालुक्यातील स्थानिक काजु उत्पादक शेतकऱ्यांची उत्तम प्रतिची व विक्री योग्य काजु बी १२० रुपये प्रति किलो दराप्रमाणे खरेदी केली जाणार असुन तालुक्यातील सर्व काजु उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नांवे नोंदणी करण्यासंबंधी आवाहन वैभववाडी ता.ख.वि . संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे महेश गोखले व त्यांचे सहकारी यांनी केले आहे.












