फोंडाघाट बाजारात दुर्मिळ होत चाललेल्या घोंगडी विक्रेत्यांचे दर्शन

विस्मृतीत गेलेली कोकणातील शेती आणि आयुधा ना त्या निमित्ताने उजाळा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अजूनही कोकणातील ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांमधील शेतकरी शेतीच्या दुर्मिळ होत चाललेल्या साहित्याचा आयुधांचा अन गोष्टीचा वापर करतात. हे आय.टी.अन यंत्रयुगा तील पुढील पिढीला अचंबित आणि मार्गदर्शन करणारे आहे. पूर्वी शेतीचा पेरा, तरवा काढतानाची लोकगीते, उखळ-दुड आणि चिखलणी साठी राजा-सर्जाचे जोत, कापणी आणि झोडणी साठी पारंपारिक हत्यारे, वारवणीसाठी पश्चिमेचा वारा या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत.आणि या प्रत्येकाची जागा यंत्राने घेतली आहे.जोडीला थंडी, मुसळधार पाऊस- वाऱ्यापासून संरक्षण देणारी इरली-घोंगडी नाहीशी होऊन त्या जागी प्लास्टिकचे कागद, रेनकोट, छोटे- मोठे पावर टिलर दिसू लागले आहेत.

गेल्या कित्येक वर्षा नंतर आज फोंडाघाटच्या आठवडी बाजारात तारळे आणि सांगलीचे मनोहर बोंगाळे या घोंगडी व्यापाऱ्यांचा ठेला सर्वांचेच आकर्षण आणि कुतूहल ठरत आहे. काहीजण दर विचारण्यासाठी तर काहीजण आपल्या मुलांना हे वस्त्र दाखवण्यासाठी विक्रेत्यांचे दुकानी येत आहेत .तर व्यापारी घोंगडीच्या घडवणी पासून ते आजवरच्या प्रवासाबद्दल समरस होऊन माहिती देत आहेत.त्याही वेळी गोरगरीब- शेतकऱ्यांना ऊब देणारी आणि न परवडणारी घोंगडी, आजही किमती वाढल्याने विस्मृतीत जात आहे.

error: Content is protected !!