वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे पुनर्वसन गावठाणातील मोतीराम रामचंद्र शेलार यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले. ही घटना गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पुतण्याच्या ही निदर्शनास आली. मात्र घर मालक मुंबईला असल्यामुळे घरातून नेमके काय चोरीस गेले आहे का हे समजू शकले नाही. गेल्या मे महिण्यात पुनर्वसन गावठाणातील पाच घरे अज्ञात चोरट्याने फोडली होती. त्याचा तपास ही अद्याप लागलेला नाही. या घर फोडीमुळे पुनर्वसन गावठाणातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आखवणे पुनर्वसन गावठाणात शेलार यांचे घर खारेपाटण भुईबावडा राज्य मार्गा लागत आहे.त्यांचे कुटुंबीय मुबंईला असतात. त्यामुळे घर बंद असते. गुरुवारी त्यांचा पुतण्या हा त्यांच्या घराकडे आला. त्यावेळी त्याला घराची खिडकीची ग्रील उचकटून काडलेली त्यांना दिसली. त्यांनी घराच्या मागच्या बाजूला जाऊन पाहिले असता, मागच्या दरवाजावर लावलेल्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडले होते. मात्र त्याला डबल कुलूप असल्यामुळे तो दरवाजा त्याला उघडता आला नाही. मात्र खिडकीच्या ग्रील काडून त्याने घरात प्रवेश केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पुतण्याने शेलार यांना माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे पोलीस पाटील पावले यांनाही ग्रामस्थांनी माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनील अवसरमोल आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सुरु आहे.