वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले अनेक महिन्यांपासून वैभववाडी – नापणे – कणकवली एस टी सेवा सुरू करावी अशी. नापणे, नाधवडे आणि कोकिसरे विभागातील विद्यार्थ्याची मागणी होती. त्याना वैभववाडी शाळा / कॉलेज सुटल्यावर ते घर असे प्रवासाची मुख्य अडचण होत होती. त्यासाठी “नापणे महोत्सव समिती”, यांनी एस टी महामंडळाकडे मागणी ही लावून धरली होती. ही बाब, सतीश सावंत यांच्या निदर्शनास आली. त्यांनी कणकवली आगर व्यवस्थापक अभिजित पाटील यांच्याशी भेट घेऊन, नापणे ग्रामस्थांची अडचण दूर करण्याची विनंती करता ती मागणी मान्य करून, आज पासून दुपारी १२:३० वाजता ही एस टी सेवा सुरू करण्यात आली. त्याचे चालक व वाहक यांचे यादव वाडी थांबा (नापणे) येथे आज ग्रमस्था तर्फे स्वागत करण्यात आले. त्या वेळी शिवसेना जिल्हा कार्यकारणी सदस्य, संदीप सरवणकर, नापणे महोत्सव पदाधिकारी सदानंद पाटील, विनोद जठार, संतोष पाटील, तात्या पाटील, शंकर कोकरे, सुरेश सरवणकर तसेच इतर नापणे प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि यशवंत गव्हाणकर व इतर कोकिसरे प्रतिष्ठित ग्रामस्थ सर्व पांडुरंग पाटील, मनोहर पाटील, रमेश पाटील, प्रेमदत्त माने, रमेश जठार, सुरेश यादव, राजेश यादव, उमाकांत राणे, तसेच विध्यार्थी ओमकार शिर्के, नम्रता गुरव, अंतरा जैतापकर, अभिषेक शिरकर हे उपस्थित होते.