असलदे गावाला स्वतंत्र तलाठी मिळाल्याने शेतकरी व नागरिकांना सोयीचे होईल – भगवान लोके

असलदे ग्रामस्थांच्यावतीने नुतन तलाठी माधुरी काबरे यांचा सत्कार ; असलदे ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावात स्वतंत्र तलाठी सजा मंजुर झाल्यानंतर तलाठी मागणी केली होती.याबाबत सातत्याने पाठपुरावा,प्रांताधिकारी,तहसिलदार यांच्याकडे करण्यात येत होता.आता तलाठी सजेवर माधुरी काबरे यांच्या नियुक्तीचे आदेश झाले आहेत.त्यामुळे लवकरच असलदे गावामध्ये तलाठी उपलब्ध होणार आहे.यासाठी ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी प्रांताधिका-यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यावेळी आ.नितेश राणे यांनी तातडीने तलाठी देण्याच्या सुचना प्रशासनाला केल्या होत्या.त्यामुळे असलदे गावाच्या प्रलंबित तलाठी मागणीला यश आले आहे.

यासाठी त्याचबरोबर सरपंच चंद्रकांत डामरे,चेअरमन भगवान लोके,उपसरपंच सचिन परब,माजी सरपंच पंढरी वायंगणकर, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर व गावातील सर्व ग्रामस्थांनी सातत्यपूर्वक प्रशासनाकडे पाठपुरावा केला.त्याला यश प्राप्त झाले आहे.असलदे गावासाठी स्वतंत्र तलाठी नियुक्ती झाल्यामुळे आगामी काळात गावातील शेतक-यांची कामे,मुलांच्या उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी अहवाल व तलाठी कार्यालयासंबंधित विविध कामे गावातच होणार असल्याने शेतक-यांना दिलासा मिळणार आहे

असलदे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन, लहान मुलांचे गीत गायन कार्यक्रम पार पडला तसेच असलदे ग्रामस्थांच्यावतीने नुतन तलाठी माधुरी काबरे यांचा सत्कार सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, माजी चेअरमन प्रकाश परब, महेश लोके, रघुनाथ लोके, देवेंद्र लोके, प्रदीप हरमलकर, संतोष परब, वासुदेव दळवी, सोसायटी संचालक उदय परब, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे, ग्रा.पं. सदस्य स्वप्ना डामरे, विद्या आचरेकर, तुषार घाडी, प्रविण डगरे, प्रविण डामरे, दिनेश शिंदे , ग्रामसेवक संजय तांबे, मुख्याध्यापिका विनिता सावंत, शिक्षिका अर्चना लोके, अंगणवाडी सेविका कोमल परब, आशा सेविका, भाग्यश्री नरे, साक्षी हडकर, संजना हडकर, पोलीस पाटील सावित्री पाताडे, कर्मचारी मधुसुदन परब, सायली दळवी, गौरी लोके, प्रतिक्षा परब, सत्यवान घाडी, प्रकाश वाळके, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नुतन तलाठी माधुरी काबरे म्हणाल्या असलदे गावातील नागरिकांना माझ्या तलाठी निवडीबद्दल जो सन्मान केला . त्याबद्दल मी ऋणी आहे. या गावात तलाठी म्हणून काम करण्यापूर्वी पुढील एक ते दीड महिना प्रशिक्षण कालावधी आहे. तरी देखील जे अधिकार तहसिलकार्यालयातून मला प्राप्त होतील. त्यानुसार नागरिकांना सेवा मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. लवकरच वरीष्ठांच्या आदेशानुसार असलदे सजा येथे माझे कामकाज सुरु करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, असलदे गावात नुतन तलाठी आल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!