कोकणच्या प्रवेशद्वारावर फोंडाघाट मध्ये जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांचे कोकणच्या प्रवेशद्वारी ,फोंडाघाट बाजारपेठेत रात्री उशिरा मोठ्या उत्साहाने, फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. येथील मराठा समाजाचे स्थानिक नेते राजू पटेल, राजू रावराणे, पिंटू पटेल यांनी जरांगे पाटील यांना पुष्पहार घालून आणि भगवी शाल परिधान करून, त्यांचा फोंडाघाट मराठा समाजातर्फे सत्कार केला. यावेळी फोंडाघाट पंचक्रोशीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते- सदस्य तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शाम भोवड, संजु नेरूरकर,संतोष टक्के,अशोक सावंत, दळवी मॅडम, साटम मॅडम, पाटील मॅडम इ. सह तमाम कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत स्वागतासाठी वाट पहात उभे होते. अखेर छोटेखानी स्वागत स्वीकारून, जरांगे पाटील यांचा सुमारे तीस वाहनांचा ताफा कणकवलीच्या दिशेने रवाना झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!