दायची लाईफ इंन्शुरन्स विमा योजनेतून 3 लाख 42 हजाराचा धनादेश सुपूर्द
देवगड (प्रतिनिधी) : स्टार युनियन दायची लाईफ इंन्शुरन्स विम्याव्दारे वाडा मुळबांध येथील प्रविण दत्तात्रय जाधव यांचे वारसांना 3 लाख 42 हजार रुपयांचा विमा धनादेश देण्यात आला.
दोन वर्षापुर्वी वाडा मुळबांध येथील प्रविण दत्तात्रय जाधव यांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे वारस प्राची प्रविण जाधव व मुलगा अनुज प्रविण जाधव या वारसांना 3 लाख 42 हजार रुपयांचा विमा धनादेश बँक ऑफ इंडिाया वाडा बँकेचे व्यवस्थापक राजेश बाट, महेंद्र मराठे स्टार युनियन दायची लाईफ इंन्शुरन्सचे सर्फराज मेमन यांच्या हस्ते देण्यात आला.
वाडा मुळबांध येथील प्रविण दत्तात्रय जाधव यांचे नोव्हेंबर 2021 रोजी अकाली निधन झाले होते त्यांनी बँक ऑफ इंडिया वाडा मार्फत स्टार युनियन दायची लाईफ इंन्शुरन्सचा विमा काढला होता. सदर योजनेचा विम्याचा एकच हप्ता त्यांनी भरला होता. या नंतर त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे बँक ऑफ इंडिया मार्फत् राबविल्या जाणा-या स्टार युनियन दायची लाईफ इंन्शुरन्स विमा योजनेतून प्रविण जाधव यांचे वारस पत्नी प्राची जाधव व मुलगा अनुज जाधव यांना 3 लाख 42 हजार रुपयांचा विमा धनादेश बँक ऑफ इंडिाया वाडा बँकेचे व्यवस्थापक राजेश बाट, महेंद्र मराठे यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी बँक ऑफ इंडिया वाडा शाखेचे अभिजित कुंभरे,निलेश आचरेकर,परदिव कुमार,आकाश मोरे आदी उपस्थित होते.