माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : 1 डिसेंबर 2024 रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे “एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली” उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन चॉकलेटचा मोठा खजाना बॉक्स उघडुन कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या चॉकलेट मध्ये अनेक बक्षीस लपवलेली असतील. हा चॉकलेटचा बॉक्स मुलांनी चॉकलेट लुटून उद्घाटन करायच आहे. या वेळी मुंबईतील ऑर्केस्ट्रा चां गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे . तसेच जादू चे प्रयोग होणार आहेत. लहान मुलांना आकर्षण असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून, मिकी माऊस देखील या ठिकाणी असणार आहेत. लहान मुलांच्या हातावर टॅटू देखील मोफत काढून देण्यात येणार आहेत. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी , थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्टॉल साठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणार आहे. तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. झोपाळे, पाळणी, अनेक खेळणी देखील या ठिकाणी असणार आहेत. तसेच सेल्फी पॉईंट देखील असणार आहे. स्थानिकांना, बचतगटाना स्टॉल साठी प्राधान्य देण्यात येणार देणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. या खाऊ गल्ली मध्ये पिझा, पाणीपुररी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शोरमा, चायनीज, असे अनेक स्टॉल असणार आहेत. यासोबत या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक लहान मुलास भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.