तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रविण्य परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील पाचवी मधून कु.आदर्श दीपक जाधव आणि आठवी इयत्तेतून कु.वेदिका दीपक तेली या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. ही दोन्हीही गुणवंत विद्यार्थी पुढील प्रज्ञाशोध परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांना एस्.एस्.पेडणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर गणित विभागप्रमुख व्ही.व्ही. मुद्राळे आणि गणित विभागातील इतर सर्व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य एम.डी खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.